Ticker

6/recent/ticker-posts

वाशीममध्ये भाजपचे श्याम खोडे यांचा दणदणीत विजयी


वाशीम मंगरुळपीर विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा चे डॉ. सिद्धार्थ देवळे यांना भाजपचे उमेदवार श्याम खोडे यांनी पराभूत करून भाजपचा गड कायम ठेवला आहे.
शिवसेना उबाठा उमेदवार सिद्धार्थ देवळे यांनी उमेदवारी मिळवण्यापासून प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती. एक्झिट पोल मध्ये त्यांचेच नाव संभाव्य आमदार म्हणून होते. मात्र, मतमोजणीत श्याम खोडे यांना मिळत असलेले मताधिक्य कापता आले नाही. शिवसेनेच्या सिद्धार्थ देवळे यांना 20 हजार 63 मतांनी भाजपाचे श्याम खोडे यांनी पराभूत करून विजय संपादित केले.

भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांना डावलून नवख्या श्याम खोडे यांना उमेदवारी दिल्याने भाजपचा पराभव निश्चित मानल्या जात असताना माझी पालकमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब चंद्रकांत दादा ठाकरे यांनी खूप मोठी मोलाची भूमिका निभवली मतदारसंघात जोमाने फिरून श्याम खोडे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली   भाजपाला तन-मन धनाने पाठिंबा दिल्याने भाजपा विजय सुखर झाला. भाजपचे कार्याध्यक्ष राजू पाटील राजे, अशोक हेडा, पुरुषोत्तम भाऊ चितलांगे, सुनील मालपाणी, सतीश हिवरकर, डॉक्टर दत्तात्रय चौधरी,  नवशा गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते,शेषरावजी चौधरी,डॉक्टर दिलीप रत्नपारखी, प्राध्यापक ज्येष्ठ पत्रकार नंदलाल पवार सर, माजी नगराध्यक्ष वीरेंद्रसिंह ठाकूर, गंगाधर जी कांबळे, जगदीश जी काबरा, हरिदास ठाकरे, विनोद चौधरी, बाळासाहेब हवा, सचिन कुलकर्णी, मंगेश धानोरकर, प्रा. नंदकिशोर गोरे, प्रा. शेळके, प्रा. श्रीराम  मिटकरी, माजी सैनिक अशोक बेंद्रेयां च्यासह अनेकांनी मतदारपर्यंत जाऊन शरतीचे प्रयत्न केल्याने भाजपाला विजय संपादित करता आला असे समाजसेवक राम ठाकरे  यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments