Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर विद्यालयामध्ये संविधान दिन साजर


 श्री धानोरकर  आदर्श विद्यालयामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री उचित सर होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री पाटील सर व कु.होले मॅडम होत्या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये वर्ग पाच ते दहाच्या  विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यामध्ये भाषण गीते व नाटिका सादर केली प्रमुख अतिथी श्री पाटील सर व हुले मॅडम यांनी भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व संविधानाची माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उचित सर यांनी स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची महत्व विशद केले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन वर्ग सातवी ची विद्यार्थिनी कु ऋतुजा भगत हिने केले तर आभार कुमारी नेहा सानप हिने मानले

Post a Comment

0 Comments