Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथे श्याम खोडे यांची विजयी मिरवणूक व लाडू तुला



मंगरूळनाथ : वाशिम विधानसभा
मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्याम खोडे यांची विजयी आभार मिरवणूक शहरात शुक्रवारी  काढण्यात आली व  लाडू तुला सुद्धा याप्रसंगी मोठा आनंद उत्सवात साजरी करण्यात आले .  
महात्मा फुले चौकातून विजयी मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत  रा.कॉ. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, भाजप जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे, भाजपाचे सर्वेसर्अ शोक हेडा, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश लुंगे, चितलांगे इंडियन गॅस च संचालक पुरुषोत्तम चितलांगे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष  शीघ्र कवी सुनील भाऊ मालपाणी, युवा संघटक सतीश हिवरकर, माजी नगराध्यक्ष विरेंद्रसिंग ठाकूर,
  सामाजिक कार्यकर्ते राम पाटील ठाकरे, चंद्रकांत पाकधने, सचिन राऊत,  मनीष गहुले, उमेश पाटील गावंडे, अँड. नितीन तेलगोटे, राजाभय्या पवार, शशिकांत पेंढारकर,  डॉ दिलीप रत्नपारखी, रवींद्र ठाकरे,  बाळू पाटील, तसेच  वाशिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्याम खोडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत गुलाल उधळून व फटाके फोडून तसेच मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान श्याम खोडे यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शामभाऊ खोडे यांची लाडू तुला करण्यात आली याप्रसंगी चितलांगे इंडियन गॅस चे संचालक पुरुषोत्तम भाऊ चितलांगे, सौ लताताई चीतलांगे, सौ बेबीताई विजय चव्हाण यांनी औक्षण करून लाडू तुला करण्यात आले 
लाडू तुला करताना चितलांगे परिवार
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनिल गावंडे व त्यांच्या सहकार्यासह
 शहरात आनंद उत्सवात विजय रॅली 
राम ठाकरे सह आमदार श्याम खोडे यांनी धरला ठेका आनंद उत्सव साजरा करताना

माजी राज्यमंत्री सुभाष रावजी ठाकरे साहेब यांच्या निवासस्थानी  टिपलेली क्षणचित्रे
व्यापारी संघटनेच्या वतीने आनंद बजाज , श्रीकृष्ण पाटील चौधरी 
सुभाष चौकात भव्य सत्कार करताना कार्यकर्ते 

Post a Comment

0 Comments