Ticker

6/recent/ticker-posts

वाशीत 'भीमछावा' संस्थेतर्फे १३४ वी भीमजयंती उत्साहात साजरी– रक्तदान, भीमगीतांचा गजर आणि मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाने सजली वाशी


वाशी, नवी मुंबई – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती ‘भीमछावा’ संघटनेतर्फे मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.
या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, डॉ. आंबेडकर गार्डन, सेक्टर ९, वाशी येथे नवी मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ३४ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध कवी व गायक संगमदादा कासारे यांच्या भीमगीतांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हा कार्यक्रम आनंद शिंदे यांचे पटशिष्य संगमदादा कासारे गायन पार्टीच्या सादरीकरणामुळे विशेष गाजला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सिडको बीसी एम्प्लॉय फेडरेशनचे जनरल कामगार युनियन अध्यक्ष मा. नरेंद्र हिरे यांचा सत्कार वाशी 'बुद्ध प्रतिष्ठान'चे अध्यक्ष डॉ. अनंत हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष (आठवले गट) महेश खरे, निरीक्षक सिद्राम ओहोळ, कार्याध्यक्ष युवराज मोरे, घर हक्क संघर्ष समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष खाजा मिया पटेल, प्रकाश वानखेडे, बौद्धाचार्य गमरे गुरुजी, अॅड. यशपाल ओहोळ, प्रतीक जाधव, माजी नगरसेवक विजय वाळुंज, अजय वाळुंज, नेताजी कांबळे, बर्वे साहेब, केदारे साहेब, हिरे ताई, कमल इंगळे, सोनल अनंतराज गायकवाड, अहिरे ताई आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्टीफन स्वामी मित्र मंडळातर्फे उपस्थितांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन 'भीमछावा' संस्थेच्या महिला संघटक वंदनाताई आरकडे, अध्यक्ष मा. विलास मोकल, खजिनदार सिद्धार्थ ठोकळे, सहसचिव भाग्यवंत गायकवाड, राज ठेंगिल, रवि चव्हाण, हेमंत हिरे, दिलीप ओहोळ, प्रशांत गायकवाड, दिलीप गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती, असे प्रतिपादन अनंतराज गायकवाड यांनी केले.


Post a Comment

0 Comments