Ticker

6/recent/ticker-posts

‘भस्मांचल’चे दमदार पदार्पण! – चेन्नईच्या AGT हॉटेलमध्ये भव्य पोस्टर लाँच



नाट्यसृष्टीत एक नवा पर्व सुरू होत आहे — ‘भस्मांचल’ या नाट्यकृतीच्या भव्य पोस्टरचे आज चेन्नईच्या AGT हॉटेलमध्ये थाटात अनावरण करण्यात आलं!

लेखक मोहन नायर यांच्या अर्थपूर्ण लेखणीतून साकारलेली ही कथा, आणि दिग्दर्शक हर्षल राणे यांचं सर्जनशीलतेनं भरलेलं नेत्रदीपक दिग्दर्शन — या दोन कलावंतांच्या संयोगातून जन्माला आलेली ही नाट्यकृती म्हणजे एका सांस्कृतिक चळवळीची नांदीच म्हणावी लागेल.

रेवती आढाव यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्रीपासून ते 40 जणांच्या प्रतिभावान कलाकारांच्या भक्कम संचापर्यंत — ‘भस्मांचल’ हे नाटक प्रत्येक क्षणाला तुमच्या काळजाला हात घालणार आहे.

वृद्धाश्रमातील उपेक्षित आई-वडील… अनाथालयातील निरागस, भाबडी मुले… आणि त्यांचं आयुष्य झाकोळून टाकणारी बेदर्द वास्तवकथा — ‘भस्मांचल’ ही केवळ एक कलाकृती नाही, तर अंतःकरण हलवून टाकणारा अनुभव आहे!

हे नाटक प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडणार असून, समाजातील जखमा उघड करून नवचेतना जागवण्याचं सामर्थ्य त्यात आहे.

लवकरच ‘भस्मांचल’ तुमच्या शहरात — एक क्षणही चुकवू नका! कारण हे नाटक पाहून निघाल्यावर तुम्ही जसे आले होते तसे परत जाणार नाहीत…


थेट मंचावर साद घालणारी रंगमंचावर नाही केवळ अभिनय, तर जिवंत होतं काळजाचं कथानक। भस्मांचल – अनुभवायचं नाही तर जगायचं, कारण ही कथा आहे तुमच्यातल्या माणसाची !

Post a Comment

0 Comments